ध्यास नाविन्याचा
जि. प. शाळा यशवनतनगर येथे नाविन्याच्या ध्यासातून अनेकविध उपक्रम राबवण्यात आले .
कार्यानुभावातील लघूद्योजकतेचा विकास \लघूद्योगनच पाया घालण्याच्या उद्देशाने "यशवंतनगर लघुउद्योग बाजारपेठ ' हा उपक्रम हा आयोजित करण्यात आला . यात विद्यार्थ्यांचे गट पाडून गटनिहाय एका उद्योगाविषयी त्यांनी माहिती संकलित करणे अपेक्षित होते . त्याप्रमाणे त्यांनी ती माहिती मिळवली . दुसऱ्या दिवशी त्यांनी त्य उद्योगासाठी लागणारे साहित्य परिसरातून उपलब्ध करावे असे निश्चित करण्यात आले . त्याप्रमाणे मुलांनी चर्मकार ,न्हावीकाम ,इस्त्रीकाम , दवाखाना ,मेडिकल ,हॉटेल व्यवसाय , ज्वेलरी , ब्युटीपार लर इ . उद्योगांसाठीच्या साहित्याची जुळणी करून स्टोल उभारले .
No comments:
Post a Comment